ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्ती निमित्त वि. टी. पोले सरांचा काँग्रेस तर्फे शाल श्रीफळ द्वारे सत्कार

चांदा ब्लास्ट

घुग्घूस : शहरातील जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तथा प्राध्यापक श्री. वि. टी. पोले सरांच्या सेवानिवृत्ती निमित्त शहर काँग्रेस तर्फे काँग्रेस कार्यलयात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांनी शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आले.

याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष रेड्डी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना पोले सरांनी आपल्या आयुष्यातील जवळपास पस्तीस वर्ष महत्वपूर्ण वर्ष विद्यार्थ्यांना मौल्यवान ज्ञान व जीवनाचे महत्वपूर्ण धडे देण्यात घालविले आहे.

बरेचदा विद्यार्थ्यांना शिस्त लागावी म्हणून सरांनी कठोर वागणूक ही दिली

त्यांचा कणखरपणा व कठोरवृत्ती हे विद्यार्थ्यांच्या जीवनात किती महत्वाची होती हे आज सरांना निरोप देतांना आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे.

पोले सर हे उत्कृष्ट आणि मेहनती शिक्षक मुख्याध्यापक असण्यासोबत एक समर्पित व्यक्तिमत्व होते

सरांनी केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना तसेच आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन राजूरेड्डी यांनी व्यक्त केले

याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार,इंटक उपाध्यक्ष शहजाद शेख, बालकिशन कुळसंगे, रोहित डाकूर,सुनिल पाटील, कुमार रुद्रारप, दिपक पेंदोर, कपिल गोगला,दिपक कांबळे, शहंशाह शेख, अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये