ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
ॲड श्रीकांत जायभाये महाराष्ट्र उद्दोजक पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
आराध्या लॉनस चे संचालक ॲड श्रीकांत गजाननराव जायभाये यांना महाराष्ट्र उद्दोजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात प्रसिद्ध सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्यामुळे बुलडाणा जिल्ह्याचे नाव उंच पातळीवर पोहचले आहे.
ॲड श्रीकांत जायभाये आपल्या यशाचे श्रेय वडील सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक गजानन जायभाये, भाऊजी डॉ. राजु डोईफोडे,जालना बहिण डॉ. वर्षा डोईफोडे, जालना,भाऊ इंजिनियर सचिन जायभाये, छत्रपती संभाजी नगर,आई कालिंदा जायभाये यांना देत आहेत.
ऍड श्रीकांत जायभाये यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.