इनरव्हील क्लब ऑफ भद्रावतीची ओसीवी बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
इनरव्हील क्लब ऑफ भद्रावतीची ओसीवी (ऑफिशियल क्लब व्हिजिट) बैठक क्लबच्या अध्यक्षा प्रा. प्रेमा पोटदुखे यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. याप्रसंगी क्लबच्या सामाजिक प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थिनींना आवश्यक असलेली सॅनिटरी वेंडिंग मशीन यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती ला देण्यात आली.
या उपक्रमाचे उद्घाटन इनरव्हील क्लबच्या जिल्हाध्यक्षा सौ जयश्री पोफळे, भद्रावती ईनरव्हील क्लब च्य अध्यक्षा सौ प्रेमा पोटदुखे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर मोते, डॉ. ज्ञानेश हटवार, प्रा. माधव केंद्रे, प्रा. प्रेमा पोटदुखे, मनोज बांदुरकर, वर्षा दोडके आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमासाठी प्रायोजक म्हणून रोटेरियन सुनील पोटदुखे व समाजसेवक प्रा. धनराज आस्वले यांचे मोलाचे योगदान लाभले.
विद्यार्थिनींच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या प्रकल्पाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनात इनरव्हील क्लबच्या किर्ती गोहाणे, रश्मी बिसेन, प्राचार्य वर्षा धनोरकर, मनिषा ढोमणे, विभा बेहरें, वैशाली सातपुते, राजेश्री बत्तीनवार, कविता सुफी, विश्रांती उराडे, स्वाती चारी व त्रिशा नंदेश्वर यांनी विशेष सहभाग घेतला.