ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर अडीच किलोमिटरचा रस्ता केला मोकळा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

शासनाच्या शंभर दिवस उपक्रमा अंतर्गत विद्यमान उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांचे मार्गदर्शनात व तहसीलदार वैशाली डोंगरजाळ मॅडम यांचे नेतृत्वात मौजे सावखेड भोई येथील नकाशावर असलेला ओम शेठ धनावत ते सावखेड भोई धरणापर्यंत अंदाजे अडीच किलोमीटर रस्ता मोकळा झाला असून त्यामुळे अंदाजे 100 शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला.

सदर रस्ता मोकळा करण्यासाठी देऊळगाव राजा मंडळ अधिकारी रामदास माटे ग्राम महसूल अधिकारी कुमारी रगडे व गावातील नागरिक तसेच सर्व शेतकरी हजर राहून त्यांनी सहकार्य केले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये