पांगरी येथे सुजित डोणगावकर यांनी शाळेसाठी दिली जागा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
पांगरी गावामध्ये सन 1959 पासून जी प्राथमिक शाळा सुरू झाली तेव्हापासून शाळेला स्वतःची जागा नसताना मा. सुजित भाऊ डोणगावकर यांच्या वाडवडिलांनी शाळेसाठी त्यावेळेस चार गुंठे जागा दान दिली आणि त्या शाळेत आज उभी आहे परंतु लोकसंख्या वाढीनुसार गावाला आणि शाळेला खोलीआणि जागा कमी पडत असल्यामुळे उदारमनाच्या सुजित भाऊंनी खरोखर मनातला दानशूरपणा जो दाखवला आणि आज शाळेसाठी त्यांनी सुमारे साडेपाच गुंठे जमीन उदार अंतकरणाने दान दिली आणि शाळेच्या भौतिक सुविधा आणि एकूण सुविधांसाठी त्याबद्दल गावकऱ्यांनी आभार मानले.
विशेषतः दानशूर सुजीतभाऊ डोणगावकर कुटुंबीय,सर्व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग, संतोषभाऊ खांडेभराड यांची समर्थ साथ यामुळे हे शक्य होऊ शकले आहे.
तसेच शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत पदाधिकारी तथा ग्राम विकास अधिकारी व अधिनस्त कर्मचारी शिवाय ग्राम पातळीवरील सर्व समित्या तसेच गावातील प्रत्येक नागरीक यांच्या शाळेप्रति असणाऱ्या आत्मियतेमुळे “भविष्यवेधी वर्गखोली” निर्माणासाठी मोठ्या प्रमाणावर लोकवर्गणी जमा करून उत्साहवर्धक व इतरांना प्रेरणादायी ठरणारे कार्य होत आहे.
अशा गावाची व गावकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य आम्हां शिक्षकांना मिळाले यातच आमची धन्यता मानतो असे शिक्षकांनी सांगीतले.