महाकुंभ कलश तिर्थ दर्शन सोहळा उपक्रम निमणी स्थानांवर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- नुकताच प्रयागराज येथे महाकुंभ सोहळा संपन्न झाला.संपुर्ण विश्वातील हिंदु बांधव यावेळी प्रयाग राज येथिल पवित्र गंगा-यमुना-सरस्वती या त्रिवेणी संगमावर स्नान केले.परंतु जे बांधवांनी कुंभ दर्शन करून पवित्र अंघोळिचा लाभ घेऊ शकले नाही अशां बांधवांपर्यत तिर्थदर्शनाची सोय अनुलोम माध्यमातुन होते आहे.हाच उद्देश घेऊन अनुलोम ही सामाजिक संस्था राजुरा भागातील स्थानांवर कलश पुजन दर्शन सोहळे आयोजन करीत आहे.नुकताच निमणी स्थानांवर कलश पुजणाचा कार्यक्रम गावकऱ्यांच्या सहकारांतुन संपन्न झाला.यावेळी युवा उद्योजक निलेश ताजणे,अनुलोम चंद्रपुर उपविभाग प्रमुख सुनिल दालवनकर,राजुरा भाग प्रमुख सतिश मुसळे,श्रीराम घटे,प्रविण दोरखंडे,गुलाब टेकाम उपस्थित होते.
समरसता भावार्थ या उपक्रमाच्या माध्यमातुन दर्शविने या मुख्य हेतुने अनुलोम वस्ती मित्र देवानंद घाटे यांचे माध्यमातुन या कार्यक्रमाचे आयोजन झाले.१४४ वर्षांचा दुर्लभ योग महाकुंभ स्वरूपात आपणास लाभणे म्हणजेच आपली धन्यता आहे,या पावन पर्वाची प्रचिती कुंभ तिर्थ स्वरूपात आपल्याला लाभली आहे.सर्वांनी या तिर्थाचा लाभ घ्यावा असे संबोधन युवा उद्योजक निलेश ताजणे यांनी केले.समरसता भाव सुनिल दालवनकर यांनी विशद केला.अनुलोम कार्यरचनेची कार्यरचणा सतिश मुसळे यांनी सांगितली.
समस्त हिंदु बांधवांचे सौजन्याने यावेळी गावात कलश दिंडी काढण्यात आली.दिंडी मार्गावरील घरासमोर कलशाचे स्वागत व पुजण झाले.हनुमान मंदिर येथे कलशाचे ११ दांम्पत्यांनी विधिवत पुजण करून दर्शंन घेतले.यावेळी गावातील श्रीराम घाटे,गजानन गोबाडे,सुधाकर पाटिल,मधुकर पाटिल,लक्ष्मण घाटे,प्रविण दोरखंडे,गुलाब टेकाम,शालिक कोडापे,चंदु आत्राम,बबन चौधरी यांचे सह गावातील मातृ शक्ती,बालगोपाल,युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.