विदर्भ महाविद्यालयाची बॉटनिकल गार्डनला भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- शैक्षणिक, वैज्ञानिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनाच्या अभ्यासाकरिता विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती येथील विज्ञान विभागाच्या वतीने नुकत्याच बल्लारपूर येथे तयार झालेल्या बॉटनिकल गार्डन ला भेट देण्यात आली.
बॉटनिकल गार्डनला भेट म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाचा शैक्षणिक अनुभव होता या भेटीदरम्यान वनस्पतीशास्त्र, पर्यावरण शास्त्र, औषधी वनस्पती आणि जैवविविधता बाबत विस्तृत माहिती घेण्यात आली. विविध प्रकारच्या स्थानिक आणि परदेशी वनस्पतीची माहिती, आरोग्यासाठी उपयोगी असलेल्या वनस्पतीचा अभ्यास जैवविविधतेचे रक्षण आणि निसर्ग संवर्धनाचे महत्त्व समजावून घेणे,प्रत्यक्ष पाहणी करून त्याचे महत्त्व जाणुन घेतले. या ठिकाणी उपलब्ध असलेल्या दुर्मिळ आणि औषधी वनस्पती संदर्भात तज्ञांचे मार्गदर्शन सुद्धा विद्यार्थ्यांना लाभले.
वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे, रोपे त्यांचे केलेले जतन विद्यार्थ्यांना फारच प्रेरक ठरले. जैवविविधतेचे रक्षण करणे व त्याचे नियम पाळणे हा मोलाचा मंत्र प्रत्येकांना बघण्यास मिळाला. शैक्षणिक सहली दरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळतो आणि विषयातील ज्ञानात वृद्धी होते. आज पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टी ही जैवविविधतेवर अवलंबून असून त्याचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. हा मोलाचा संदेश या बॉटनिकल गार्डनला भेट दिल्यानंतर प्रकर्षाने जाणवून येतो. सोबतच वेगवेगळ्या फुलपाखरांचा किटकांचा अभ्यास करण्याचा योगही विद्यार्थ्यांना मिळाला. अशी ही सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना मिळवून देण्याकरिता महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागाचे प्रा. सचिन शिंदे यांनी पुढाकार घेऊन. विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
सदर शैक्षणिक सहलीच्या आयोजनाकरिता महाविद्यालयाच्या प्राचार्यां डॉ. शाक्य यांनी मोलाचे सहकार्य केले तर प्रा.लांडगे, डॉ. डोर्लीकर, प्रा. सदुलवार, प्रा. मुंडे, प्रा. मस्कले, डॉ. अली, डॉ. खेडेकर, डॉ. दुर्योधन, प्रा. सचिन, प्रा. बोरकर प्रा. राठोड, प्रा. ताडाम, सगुणा बिरादार यांनी शैक्षणीक सहल यशस्वी करण्याकरीता अथक परिश्रम घेतले.