तहसील कार्यालयात पोलीस पाटलांची आढावा बैठक संपन्न
तहसीलदार राजेश भांडारकर यांची विशेष उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
दिनांक 11 मार्च 2025 रोजी राजेश भांडारकर तहसीलदार भद्रावती यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील पोलीस पाटील यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सुधीर खांडरे नायब तहसीलदार हे उपस्थित होते.
तहसीलदारांकडून गावातील पांदण रस्त्यांबाबत च्या समस्या उपस्थित झालेले आहे त्या गावातील पांदण रस्त्यांचा प्रश्न तात्काळी निकाली लावण्यात येईल तसेच प्रत्येक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढण्यासाठी पोलीस पाटलांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटून व त्याबाबत जनजागृती करून प्रत्येकाना माहिती देऊन त्यांचे फार्मर आयडी काढण्यात यावी यावर विशेषतः भर देण्यात आले. याची सविस्तर माहिती कलेक्टर साहेबांना देण्यात येईल अशी माहिती पोलीस पाटलांना देण्यात आली.
स्माशानभुमी बाबत व ज्या गावात पूर परिस्थिती उद्भवून वाहतूक व रस्ते बंद होते अशा गावांची माहिती घेऊन त्यावर पूर्व उपाययोजना करून त्याचे निवारण करण्यात येईल असे तहसीलदार साहेबांनी हमी देऊन प्रत्येक गावातील पोलीस पाटलांच्या समस्या जाणून घेतल्या. पोलीस पाटील हा प्रशासनाचा कान, नाक, डोळा असल्यामुळे कुठल्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थितीची माहिती पोलीस पाटील तात्काळ प्रशासनाला पोहोचविते अशा प्रकारची प्रशंसा तहसीलदार साहेबांनी केली.
या झालेल्या आढावा बैठकीबाबत योगेश मत्ते जिल्हा अध्यक्ष पोलीस पाटील यांनी राजेश भांडारकर तहसीलदार यांचे आभार मानले.