सुरक्षित भविष्याकरिता निरोगी बालपण ही काळाची गरज – डॉ. प्रीतम खंडाळे
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन ; शेकडो शालेय विद्यार्थांची केली आरोग्य तपासणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन उपजिल्हा रुग्णालय ब्रम्हपुरी मार्फत राष्ट्रिय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 चे उद्घाटन कार्यक्रम ब्रम्हपुरी येथील नेवजाबाई हितकारणी कन्या विद्यालय ब्रम्हपुरी या शाळेत संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रीतम खंडाळे, वैद्यकिय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय ब्रम्हपुरी यांची उपस्थिती होती. तर उद्घाटक म्हणून डॉ. सुखदेवे मॅडम, तालुका आरोग्य अधिकारी तर प्रमुख अतिथी म्हणून मयूर लाडे सर, गटशिक्षणाधिकारी पं. स. ब्रम्हपुरी, नेवजाबाई हितकारणी कन्या विद्यालयाच्या प्राचार्य बनपूरकर मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्या नगर चे मुख्याध्यापक चौधरी सर वैद्यकिय अधिकारी डॉ ठक्कर सर, डॉ . डोकरीमारे सर, वैद्यकिय अधिकारी आर.बी.एस.के., डॉ. ज्योती खरकाटे, डॉ. नितीन सिडाम डॉ . स्नेहल कहूरके, डॉ.अमित रामने, झनकलाल मेश्राम, रुपेश सोंडवले, प्रिया आखाडे, पुष्पा गोल्हार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी पुणे इंदिरा गांधी मॉडेल स्कूल येथील राज्यस्तरीय मेळावा आणि उद्घाटन कार्यक्रमाचे आभासीपद्धतीने थेट प्रक्षेपण नेजाबाई कन्या विद्यालय येथे दाखविण्यात आले.
राज्यातील जिल्हा स्तरावरील 35 तर तालुका स्तरावरील 355 शाळांमध्ये हा उद्घटनीय कार्यक्रम संपन्न झाला. ब्रम्हपुरी तालुक्यांतील नेवजाबाई हितकारीणी कन्या विद्यालय ची निवड करण्यात आली होती. 0 ते 18 वर्ष वयोगटातील शाळा व अंगणवाडीमधील मुला- मुलींची विनामूल्य आरोग्य तपासणी, जन्मजात आजार व इतर आजारांवर विनामूल्य उपचार, संदर्भ सेवा, शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेनगुरे सर यांनी केले. तर आभार डॉ.नितीन सीडाम यांनी मानले. या कार्यक्रमाकरिता विद्यालयातील शिक्षक शिक्षीका, कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. तसेच उपस्थीत सर्व विद्यार्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
डॉ. प्रीतम खंडाळे, वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय ब्रम्हपुरी
विद्यार्थांच्या सुरक्षित भविष्यासाठी निरोगी बालपण व आरोग्य तपासणी ही काळाची गरज असून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या निमित्याने 0 ते 18 वयोगटातील विद्यार्थांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे त्यामुळें मोठी घटना घडण्यास प्रतिबंध घातला जाईल असे प्रतिपादन डॉ. प्रीतम खंडाळे यांनी केले.