ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रेम प्रकरणातून प्रेमी युगाची गळफास घेऊन आत्महत्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी :- तालुक्यातील मौजा उचली स्मशानभूमी जवळून जाणाऱ्या मोठ्या इलेक्ट्रिक टॉवर ला गळफास घेऊन प्रेमी युगल यांनी आत्महत्या केल्याची घटना आज दी 2 ला उघडकीस आली.

         मौजा उचली येथील रोहित रमेश लिंगायत वय 25 तर चांदली येथील गायत्री उर्फ सोनी अनिल गणवीर वय 14 असे मृतक प्रेमी युगालाचे नाव असून सदर प्रकरण हे प्रेम प्रकरणातून घडले असल्याची माहिती आहे.आज दि 2 ला दुपारच्या वेळेस सदर प्रेमी युगुल गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून असल्याने एकच खळबळ उडाली.प्राप्त माहिती नुसार सदर आत्महत्या ही एक दिवस आधीची असल्याचे सांगितले जाते.

          ब्रम्हपुरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन प्रेत ताब्यात घेऊन शव ब्रम्हपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये