ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा जालना मार्गावरील ते जिवघेणे खड्डे कधी बुजवणार!

शालेय विद्यार्थी व परिसरातील नागरिकांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा ते जालना मार्गावर सद्गुरू होस्टेल समोर मोठ मोठे खड्डे बऱ्याच महिन्यापासून पडले आहेत.
या मार्गावर दिवस रात्र वाहतूक सुरू असते,जवळच देऊळगाव राजा हायस्कूल असल्याने विद्यार्थी,शिक्षक सुध्दा याच मार्गाने जातात.
या खड्ड्यामुळे आजपर्यंत बरेच अपघात झाले आहेत. मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरी संबंधित विभागाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष द्यावे व तात्काळ खड्डे बुजवावे,अशी मागणी शालेय विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये