ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा १००% निकाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलने दहावीच्या बोर्ड परीक्षेतील १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत यशाची नवी शिखरे गाठली आहेत. यंदाही शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवित यश मिळवत शाळेचे नाव उज्वल केले आहे.

या यशामध्ये विद्यार्थ्यांनी स्व-अभ्यासावर भर देत कोणतीही खाजगी शिकवणी न लावता केवळ शाळेच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला. परिणामी, गुणवत्तेचा उत्कृष्ट नमुना सादर करत सर्व विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
विद्यार्थिनी नेहा शिंदे हिने ९३.४०% गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला आहे. रोहन खरात याने ९१.४०% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला असून श्रुतिका जाधव हिने ९१.२०% गुण मिळवून तृतीय क्रमांकावर आपले नाव कोरले आहे.

याशिवाय, अवनी गढीकर (९०.८०%) आणि प्रज्वल दंदाले (८८.८०%) यांनीही प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण होऊन शाळेचा गौरव वाढवला आहे.
या उल्लेखनीय यशामागे शाळेच्या व्यवस्थापनाचा दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोन, शिक्षकांचा समर्पित प्रयत्न व विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास हे महत्त्वाचे घटक आहेत.संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मीनलताई शेळके व सचिव डॉ. रामप्रसाद शेळके यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शाळेचे प्राचार्या डॉ. प्रियंका देशमुख, उपप्राचार्य फैसल ओस्मानी, तसेच शिक्षकवृंदांमध्ये बाळासाहेब गोजरे, रीना निर्मल, पवन खापरे, मुकुल गवई, निलेश गवई, आकाश अग्रवाल यांच्या योगदानाचे विशेष कौतुक करण्यात आले.

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलने केवळ परीक्षेतील यश नव्हे तर मूल्याधारित व अभ्यासकेंद्रित शिक्षणाच्या माध्यमातून गुणवत्तेची नवी परंपरा घडवली आहे. परिसरातून पालक, नागरिक व शिक्षणप्रेमींकडून या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये