ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरकुलधारकाकडून लाच घेतांना ग्रामसेवक जाळ्यात

चंद्रपूर लाचलूचपत विभागाची कारवाई ; सावली तालुक्यातील लोंढोली येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

  तालुक्यातील लोंढोली येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाल्याने रक्कम देयके काढण्यासाठी प्रमाणपत्राकरीता 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून चंद्रशेखर रामटेके या ग्रामसेवकास अटक केली.

 सावली तालुक्यातील लोंढोली येथील रहिवासी यांच्या वडिलांचे नावाने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले, या योजनेतील सर्व प्रशासकीय कामे मौजा लोंढोली ग्रामपंचायत चे ग्रामसेवक चंद्रशेखर रामटेके हे हाताळीत होते. दरम्यान पहिला हप्ता व दुसऱ्या हप्त्याची रक्कम अदा करण्यात आली परंतु तिसऱ्या हप्त्याचे देयकासाठी प्रमाणपत्रकरिता ग्रामसेवक रामटेके यांनी 20,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची तयारी नसल्यामुळे त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्राप्त तक्रारीवरून दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सापळा रचला दरम्यान ग्रामसेवक रामटेके यांनी तडजोडीअंती पहिले 10,000 व नंतर 10,000 रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली त्यावरून सापळ्या दरम्यान तक्रारदाराकडून ग्रामसेवक चंद्रशेखर रामटेके यांनी 10,000 रुपयांची लाच स्वीकारली. ग्रामसेवक रामटेके विरुद्ध पोलीस स्टेशन सावली येथे गुन्हा करून अटक करण्यात आली आहे.

     सदर कार्यवाही डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र. वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टॉफ पो. हवा. नरेशकुमार नन्नावरे, हिवराज नेवारे, प्रदीप ताडाम, पुष्पा काचोळे, चा.पो.अं. संदिप कौरासे यांनी यशस्वी पार पाडली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये