ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
रामधून दिंडीने अवघी निमणी दुमदुमली
निमणी येथे श्रीमद् भागवत सप्ताह

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या निमणी येथे श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. १७ फेब्रुवारी सकाळी सहा वाजता ध्यानपाठ आटपून सकाळी सात वाजता रामधून दिंडी हनुमान मंदिर पासून मेन चौक वडाच्या झाडापासून भागवत सप्ताह कार्यक्रम स्थळी पोहोचली या रामधुन दिंडीमध्ये महिलां डोक्यावर कलश घेऊन एकाच रंगाच्या साड्या परीधान केल्याने महिला व भजने रामधुन दिंडीचे आकर्षण ठरले.
रोज सकाळी ध्यानपाठ,रामधुन, भागवत कथा,सामुदायिक प्रार्थना, हरिपाठ झाला,भागवत सप्ताहाला हभप भागवताचार्य प्रशांत भोयर महाराज यांनी मार्गदर्शन केले ,20 फेब्रुवारी रोजी समाप्ती झाली,निमणी परिसरातील भाविक भक्तांनी श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाचा लाभ घेतला,