महात्मा गांधी महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयामध्ये दि. 20 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2025 या दरम्यान विद्यार्थी विकास विभागाद्वारे व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये दररोज किमान तीन वक्त्यांचे वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान निश्चित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांचा भविष्यकालीन सर्वांगीण विकास व त्यांचे व्यक्तिमत्व कसे खुलेल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे विद्यापीठाच्या निर्देशानुसार हा कार्यक्रम महाविद्यालयांमध्ये आयोजित केला जातो ,कौशल्य विकास, शिक्षण, आरोग्य, सेवाभाव व येणाऱ्या काळातील विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने, आर्थिक मजबुती, बँकांचे व्यवहार, स्वयंरोजगार अशा अनेक विविध विषयावरती विद्यार्थ्यांचे योग्य मार्गदर्शन व्हावे हा उद्देश या शिबिरामागे आहे.
दिनांक 20 फेब्रुवारी रोजी या शिबिराचे उद्घाटन डॉ. अनिल चिताडे. अधिष्ठाता. विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तथा प्राचार्य, राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले, व्यक्ती आणि व्यक्तिमत्व यामधील फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. व्यक्तिमत्त्वामुळे व्यक्तीची आठवण समाज करत असतो.
महापुरुषांना त्यांच्या व्यक्तीमुळे नव्हे तर व्यक्तिमत्त्वामुळे स्मरण जाते. असे डॉ. अनिल चिताडे म्हणाले. या कार्यक्रमांमध्ये संस्थेचे सचिव मा. धनंजय गोरे, डॉ. संजय गोरे, सदस्य, अधीसभा व्यवस्थापन समिती, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचे पण मार्गदर्शन झाले. यासोबतच शिक्षण व आरोग्य यांचा ताळमेळ घालताना डॉ. प्रवीण येडमे म्हणाले की विद्यार्थी जीवनापासूनच आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे.
डॉ. शरद बेलोरकर, एनएसएस जिल्हा समन्वयक तसेच डॉ. श्रीकांत पानघाटे यांचेही मार्गदर्शन यावेळी झाल या संपूर्ण व्याख्यानेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील व्यक्ती आणि व्यक्तिमत्व या दोघांचाही विकास कसा साधला जाईल तसेच विद्यार्थी चांगला आदर्श नागरिक कसा घडेल यासाठी प्रयत्न केले गेले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ. अजय कुमार शर्मा यांनी केले , सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे ग्रंथपाल मनोहर बांद्रे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक रामकृष्ण पटले, पवन चटारे, उत्कर्ष मुन, चेतन वैद्य, संदीप घोडिले आदींनी प्रयत्न केले तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपले योगदान दिले. महाविद्यालयातील जवळपास 135 विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.