ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावाने होत असलेले विद्रुपीकरण थांबवा – प्रा. माधुरी उके 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दि 19फेब्रुवारी ला सायंकाळी भारतीय बौद्धमहासभा शाखा गडचांदूर द्वारे आयोजित माता भीमाई रामजी आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजयांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रावण जीवणे, बौधचार्य भारतीय बौध्दमहासभा तालुका कोरपना होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा माधुरीताई उके, डाँ प्रवीण येरमे वैदकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय गडचांदूर, दिव्यकुमार बोरकर जिल्हा संघटक वंचित बहुजन आघाडी,के एन सोंडवले जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, मधुकर चुनारकर वंचित बहुजन आघाडी, उत्तमजी पारेकर, बौद्धचार्या भारतीय बौद्ध महासभा, सत्कार मूर्ती रत्नमाला वाघमारे, कविकर निरंजने, पंचमदास वाघमारे यांचे उपस्तिथीत माता भीमाई रामजी आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.

प्रा माधुरीताई उके यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याबाबत व स्त्रियाबाबत आदराने त्यांच्या सन्मान देण्याचं महान असे कार्य केले व छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास लपवून तेवण्यात येत आहे खोटा प्रचार प्रसार टीव्ही चित्रपट पुस्तकातून काही मनुवादी विचाराचे लोक करीत असताना दिसून येत आहे , छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने होत असलेले विदरूपीकरण थांबण्याची गरज आहे असे रोकठोक भाषांनातून व्यक्त केले, सर्व मान्यवरांनी आपले विचार मांडलेत

त्यानंतर सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. डाँ प्रवीण येरमे वैदकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय गडचांदूर यांचा सत्कार करण्यात आला सोबत मान रत्नमालाबाई वाघमारे सामाजिक कार्यकर्त्या यांचा सुद्धा सत्कार करून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल निरंजने यांनी केले प्रास्ताविक भाषण आशाताई सोंडवले यांनी केले व आभार प्रदर्शन शिला राहुल निरंजने यांनी केले

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्षा निरंजने, सुजाता वाघमारे, निळाबाई निरंजने,शिला आशील निरंजने, सविता वाघमारे, संगीताबाई गावंडे,वनिता रामटेके,सुनीता वाघमारे, आम्रपाली कठाने, छकुली वनकर,रीमा खैरे मंगला ताकसांडे, भारत ताकसांडे,राजू वाघमारे, शुद्धधन खैरे आदिंनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये