चोरी केलेल्या मोटारसायकल आर्वी पोलिसांनी केल्या जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलिस स्टेशन आर्वी अंतर्गत असलेल्या गावातील चोरी गेलेल्या मोटारसायकल आर्वी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात पहिला अपराध क्रमांक 50/2025 कलम 303(2) बी एन एस दुसरा अपराध क्रमांक 53/2025 कलम 303(2) बी एन एस तिसऱ्या गुन्हा अपराध क्रमांक 59/2025 कलम 303(2) बी एन एस गाडी क्रमांक MH-32AF-6433फॅशन प्रो.MH-27DV-4135 हिरो ग्मॅलर हिरो होंडा MH-32- V-0514 आला यानंतर आर्वी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश डेहनकर यांनी हा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस हवालदार योगेश चन्ने यांना देण्यात आले यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून आरोपी हे तीन जण असून एक आरोपी विधी संघर्षीत बालक व एक प्रौढ आरोपी कडून मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कुमार कवडे व उपविभागीय पोलीस अधिकारी डी सी खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली आर्वी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीश डेहनकर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस हवालदार योगेश चन्ने पोलिस शिपाई अमर हजारे नायक पोलिस शिपाई अंकुश निचत पोलिस शिपाई अमोल गोरटे यांनी केलेला आहे.