ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिलांनीच पुढाकार घ्यावा – कविता सोयाम मॅडम

चांदा ब्लास्ट

 महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिलांनीच पुढाकार घ्यावा, महिलांमध्ये सामाजिक संघटन पाहिजे तेवढे दिसत नाही, विधवा महिलांना समाजाच्या सर्वच रूढी परंपरांमध्ये सामावून घेतल्या जात नाही, त्यामुळे अशा महिलांना अनेक समस्यांना सामोरा जावे लागते. प्रत्येक महिलांनी एकमेकींच्या भावना समजून घेणे फार गरजेचे आहे. तेव्हाच जागतिक महिला दिन साजरा करण्याचे सार्थक होईल असे प्रतिपादन कविता सोयाम मॅडम (समाजसेविका) यांनी केले.

        गटचांदुर येथील शरद पवार कला व वाणिज्य महाविद्यालयात समाजशास्त्र विभाग व अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर दिनांक 11 मार्च 2024 ला सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.’ महिला सक्षमीकरण’ या विषयावर कु. दीक्षा वाघमारे, कु. शायदा अली, कु. दुर्गा चाटारे, कु. रंजीता तेलजीरे, कु. आचल वरारकर, आकाश अडवाले या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आजच्या मुला- मुलींमध्ये चांगले संस्कार होणे गरजेचे आहे.असे मत या कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका चटक मॅडम यांनी मांडले.‌हा कार्यक्रम डॉ.गोरे सर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व राज्यशास्त्र विभाग प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता.

      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बेलोरकर सरांनी केली. तसेच सूत्रसंचालन या कार्यक्रमाच्या आयोजिका डॉ. माया मसराम मॅडम यांनी केली व आभार कु. दीक्षा वाघमारे हिने केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये