ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी

दोन दिवसीय सामाजिक प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती येथील नुकताच संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समिती भद्रावती द्वारा आयोजित दोन दिवसीय कार्यक्रम मोठया थाटामाटात करण्यात आला होता हा कार्यक्रम संत शिरोमणी रविदास महाराज मंदिर दरबान सोसायटी भद्रावती येथे संपन्न झाला

समस्त जगाला समतेचा संदेश देणारे संत शिरोमणी रविदास महाराज यांनी व्यवसायिक ज्ञान प्राप्त केले संत कबीर चे समसामीइक होते अंधश्रद्धेवर त्यांनी अनेक प्रबोधन केले तसेच देशहितासाठी सुद्धा काम केले जयंती समारोह मोठया भक्ती भावाने व उत्साहात साजरी केली हा समाज करागिरी व विविध कलेत निपुण आहे

सर्व प्रथम छत्रपति शिवाजी महाराज, संत शिरोमणी रविदास महाराज, महात्मा फुले, डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यारपन व दीपप्रज्वलन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत लिपटे सामाजिक कार्यकर्ता वरोरा हे होते

तर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून व प्रमुख मार्गदर्शन संभा वाघमारे विदर्भ अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणी जिल्हा यवतमाळ, विप्लव लांडगे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ, सुभाष भटवलकर संपर्क प्रमुख राष्ट्रीय चर्मकार महासंघ चंद्रपूर, ऍड सुनील नामोजवार माजी नगराध्यक्ष नगर परिषद भद्रावती, प्रफुल चटकी माजी उपाध्यक्ष नगर परिषद भद्रावती, राजू गैनवार माजी नगरसेवक भद्रावती, शंकर वरटकर तालुका अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ वरोरा, गुलाब वाघमारे सामाजिक कार्यकर्ता भद्रावती इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते

या मध्ये पहिल्या दिवशी सकाळी 10 वाजता घटस्थापना – दुपारी 12 वाजता भजन ( महिला मंडळ ) दुपारी 2 वाजता रांगोळी स्पर्धा – सायंकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम

दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता आरती सकाळी 11 वाजता पाहुण्याचे शाल व सम्मानचिन्हे देऊन स्वागत व मनोगत तसेच सामाजिक क्षेत्रात व पत्रकार यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करणे करिता श्रीकांत मुडे अध्यक्ष, मनोज नंदरे उपाद्यक्ष, अतुल खंडाळे सचिव, महादेव कोल्हे सहसचिव, प्रकाश मेंढे कोषाअध्यक्ष, कविता मेंढे, सतीश लांडगे, गणेश खंडाळे, सविता येरेकार, प्रदीप खंडाळे, लता खोले, सरिता मेंढे, मिलिंद खोब्रागडे, सुनीता वरटकर, चंदू लांडगे, संध्या धुळे इत्यादीनी अथक परीश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये