धरणे आंदोलनाबाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाची १६ फेब्रुवारीला आढावा बैठक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे २० फेब्रुवारी २०२५ ला ओबीसींच्या न्याय मागण्यासाठी राज्यभरात धरणे आंदोलन होणार आहे. धरणे आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी १६फेब्रुवारीला वरोरा नाका येथील पत्रकार भवनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे ओबीसी, व्हीजे,एनटी & विमाप्र विद्यार्थ्याना अजूनही आधार योजनेतील रक्कम मिळाली नाही यासह जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी साठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे.
क्रिमीलेअरची उत्पन्न मर्यादा १५लक्ष रुपये करण्यात याव, आरक्षणाची ५०% मर्यादा रद्द करण्यात यावी,ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात यावा इत्यादी प्रलंबित मागण्या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर चंद्रपूर येथे धरणे आंदोलन करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, तसेच राष्ट्रीय ओबिसी महासंघाच्या सर्व कक्षाचे प्रमुख व समविचारी संघटना ओबीसी समाजात मोडणाऱ्या जातीय संघटना, विद्यार्थी यांची सभा १६ फेब्रुवारीला २०२५ रविवार ला दुपारी १ -००वाजता चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ, वरोरा नाका,चंद्रपूर,येथे आयोजित केली आहे.
तरी सर्व विंगच्या पदाधिकाऱ्यांनी सभेला उपस्थित राहण्याचे आवानह राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी केले आहे.



