
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जुगनाळा येथील पंच्चावन वर्षीय इसमाने दारूच्या नशेत स्वतःच करंजीच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना १३ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. तुळशीदास आत्राम वय (५४) असे मृतक इसमाचे नाव असून तो जुगनाळा येथील रहिवासी होता.
घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. लगेचच ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनला फोनवरून माहिती देण्यात आली. वेळीच ब्रह्मपुरी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. व सवविच्छेदनासाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे पाठवण्यात आला. फिर्यादी चुलत भावाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बांनबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत