ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

२७ न्यायाधीन तथा शिक्षाधीन बंदयांना फास्ट फुडउद्यमी बाबतचे प्रशिक्षण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मा. श्री. प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे-०१ यांचे प्रेरनेने व मा. श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्ष, पुर्व विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्हा कारागृह, येथे बंदयाकरीता सेंट्रल बैंक ऑफ यांचे सौजन्याने RSETI वर्धा यांचे मार्फत दि. ०३/०२/२०२५ ते ०८/०२/२०२५ रोजी पर्यंत एकुण सहा दिवसाच्या कालावधीत वर्धा जिल्हा कारागृह वर्ग-१ येथील एकुण २७ न्यायाधीन तथा शिक्षाधीन बंदयांना फास्ट फुडउद्यमी बाबतचे प्रशिक्षण देण्यात आले.

सदर प्रशिक्षण बंदयानी यशस्वीरित्या पुर्ण केले असुन श्री. उदय राऊत, RSETI संचालक, वर्धा यांचे मार्फत प्रशिक्षण देण्यात आले. दिनांक ०८/०२/२०२५ रोजी प्रशिक्षण पुर्ण झाले समरोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. श्री. नितीन क्षिरसागर, अधीक्षक वर्धा जिल्हा कारागृह तर प्रमुख पाहुने मा. श्री. आशुतोष राऊलकर, RSETI, वर्धा तसेच श्री. जितेंद्र भावसार तुरुंगाधिकारी, श्री. सुहास नागमोते तुरुंगाधिकरी व श्री. संजय वंजारी सुभेदार, श्री. चंद्रकांत चामलाटे हवालदार, श्री. लोकेश ठाकरे हवालदार, श्री. अरुण घरत हवालदार तसेच श्रीमती. संगिता डाबेराव हवालदार, श्री. शंकर वाघमारे शिपाई अमित कोठारकर शिपाई, श्री. गिरीष निमकर शिपाई, श्री. किशोर धोत्रे शिपाई, श्रीमती. भाविनी निमसडे म. शिपाई, श्रीमती आरती गायकवाड म. शिपाई, श्रीमती वर्षा चावरे म. शिपाई कर्मचारीउपस्थित होते.

श्री. उदय राऊत RSETI संचालक, वर्धा तथा श्री. नितीन क्षिरसागर, अधिक्षक वर्धा जिल्हा कारागृह, श्री. जितेंद्र भावसार तुरुंगाधिकारी यांचे हस्ते प्रशिक्षणार्थी बंदयांना प्रमाणपत्र देण्यात आले तसेच वर्धा जिल्हा कारागृह प्रशासनाकडुन RSETI, वर्धा यांचे सर्व टिमचे आभार व्यक्त करण्यात आले प्रशिक्षणार्थी बंदयांनी आपले मनोगत व्यक्त केले व गुन्हेगारी क्षेत्रापासुन कायम दुर होण्याबाबत निर्धार व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये