पोलीस स्टेशन वर्धा येथील घरफोडीचा गुन्हा उघड
आरोपीचे ताब्यातून 82 ग्रॅम सोने कि 2 लाख 5हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पो. स्टे. वर्धा येथे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून नमूद कलमाने सदरचा गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल व अज्ञात आरोपीचा शोध घेत असता गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून नमूद आरोपीस ताब्यात घेऊन त्याची कस्सून सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा आरोपी क्र ३) सह केल्याचे कबूल केल्याने व सदर सोने त्याने आरोपी क्र २) याची मदत घेऊन काटोल येथे सोनाराकडे विक्री केल्याने सदर चोरीतील 82 ग्रॅम सोने जु .कि 2,05,000/- रु सोनाराकडून ताब्यातून जप्त करून सदर गुन्हा उघड करण्यात आलेला आहे. सदर आरोपी 1) विक्रमसिंग सबजितसिंग टाक वय 26 वर्ष रा. गिट्टी खदान बोरगाव मेघे वर्धा, 2) संगतसिंग देवीसिंग बावरी वय वर्ष रा : रामठी ता नरखेड जि नागपुर 3) दलेरसिंग उर्फ हड्डी नेपालसिंग बावरी (पसार) यांना पुढील कारवाई करता पो स्टे वर्धा शहर यांचे ताब्यात देण्यात आले.
कारवाई पथक मा. पोलिस अधीक्षक, अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पो.नि.विनोद चौधरी,यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. नरेंद्र पाराशर, ना.पो.अं. नितीन इटकरे, सागर भोसले, पो.अं. संघसेन कांबळे, मिथुन जिचकार सर्व स्था.गु.शा. वर्धा तसेच सायबर सेल चे पो.हवा. दिनेश बोथकर यांनी केली.