ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

क्रांतिकारी संत तुकाराम महाराज पुस्तकाचा विमोचन सोहळा संपन्न

गोविंद पोलाड यांची विशेष उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

         जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल कुणबी समाज मंडळ व कुणबी समाज संघर्ष समितीच्या वतीने भव्य जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. *या सोहळ्यात अँड. गोविंद भेंडारकर लिखित “क्रांतिकारी संत तुकाराम ” पुस्तकाचे..तसेच “प्रबोधन विशेषांक 2025” या पुस्तकांचे विमोचन गोविंद पोलाड नंदुरबार यांच्या हस्ते करण्यात आले.

        यावेळी नव्याने उभारण्यात आलेल्या संत तुकाराम महाराज सभा मंडपाच्या लोकार्पण सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते.

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष ऋषी राऊत होते. त्यांच्यासह सचिव गोविंद भेंडारकर, उपाध्यक्ष प्रमोद चिमुरकर, कोषाध्यक्ष फाल्गुन राऊत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कृष्णलाल सहारे, डॉ. सतीश दोनाडकर, सल्लागार हरिश्चंद्र चोले, प्रेमलाल धोटे, चौगान ग्रामपंचायत सरपंच उमेश धोटे, अल्का खोकले, युवा व्याख्याते बेदुंधकार गोविंद पोलाड (नंदुरबार) आदी मान्यवर उपस्थित होते.

        या सोहळ्यात संत तुकाराम महाराजांच्या विचारधारेचा जागर करण्यात आला तसेच समाज प्रबोधनाचा संकल्पही घेण्यात आला. कार्यक्रमात मान्यवरांनी संत तुकाराम महाराजांच्या क्रांतिकारी विचारांवर प्रकाश टाकत त्यांचा समाजपरिवर्तनातील महत्त्वाचा वाटा अधोरेखित केला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये