ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे फळ वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        युवासेनेचे झुंजार नेते व कुशल नेतृत्व, कल्याण लोकसभा क्षेत्राचे लाडके खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे रुग्णांना फळ वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.

            हा फळ वाटपाचा कार्यक्रम मिनलताई आत्राम शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी चंद्रपूर यांचे नेतृत्वात करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना मा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने मार्गदर्शन करण्यात आले.

या वेळी मिनलताई आत्राम शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी चंद्रपूर, नानाभाऊ दुर्गे माजी नगरसेवक भद्रावती, योगेश म्यॅनेवार, विवेक दुर्गे,अभय दुर्गे, सचिन जयस्वाल,वैभव बावने व इतर शिवसैनिक उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये