वनविभागाने अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त
भद्रावती परिसरिसातील कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
वनविभागाने टाकलेल्या छाप्यात वाळूने भरलेला ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. भद्रावती ( चिचोर्डी ) वनपरिक्षेत्राच्या नियोजित क्षेत्रात अवैधरित्या वाळूचे उत्खनन व वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. ही कारवाई ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास करण्यात आली.
चंद्रपूर विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे व सहाय्यक वन संरक्षक विकास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी के. डब्लू. धानकुटे यांच्या नेतृत्वाखाली गस्त घालत महिंद्रा ट्रॅक्टर क्रमांक एम एमएच ३४ एल ७९४४ व ट्रॉली एमएच २९- ५८७० सह भद्रावती निवासी संगत सिंह यांच्या मालकीचे मौजा चिचोर्डी येथील नाल्यातून बेकायदेशीररीत्या वाळू उत्खनन व वाहतूक करताना दिसून आले. चालकाकडून वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याच्याकडे आढळून आला नाही. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर मालक आणि चालक संगत सिंग यांच्यावर कारवाई करत ट्रॅक्टर जप्त केला.
या कारवाईत क्षेत्र सहाय्यक व्ही.व्ही.शिंदे, वनरक्षक डी.एम.गेडाम व वन कर्मचारी पवन मांढरे, नितीन राऊत, अनिल शेंद्रे, अमर किन्नाके, किशोर मडावी यांनी ही कारवाई यशस्वीपणे राबवली.