ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

थेरगाव येथील सरपंचाचा भाजपाला रामराम ठोकीत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

भाजपात मोठी खिंडार ; तालुक्यातील अनेक भाजपाचे सरपंच व पदाधिकारी काँग्रेसच्या वाटेवर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रा.शेखर प्यारमवार

 राज्याचे विरोधी पक्षनेते सावली ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या सक्षम व भक्कम नेतृत्वावर विश्वास ठेवीत थेरगाव येथील सरपंच सुधीर शेरकी यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकित काँग्रेस पक्षात आपल्या कार्यकर्तासह पक्षप्रवेश केला,मागील कित्येक महिन्यापासून ते सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने व पदाधिकारी यांच्या संपर्कात होते.

भाजपच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत काल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सावली तालुका दौऱ्यावर असताना त्यांच्या प्रमुख उपस्थितीत थेरगाव येथील सरपंच सुधीर शेरकी आणी त्यांचा सहकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

सुधिर शेरकी हे पक्षप्रवेश करतावेळी माजी बांधकाम सभापती दिनेश चिटनुरवार,सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने, कृषी उत्पन्न बाजार समिती सावलीचे सभापती हिवराज पाटील शेरकी,चिचबोडी येथिल सरपंच सतीश नंदगीरवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिल सुरमवार तसेच आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्तागणं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांनी सावली तालुक्यातील अनेक भाजपाचे सरपंच व पदाधिकारी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती विरोधी पक्षनेते व सावली ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांना दिली.लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आधी असे झाल्यास भाजपात मोठी खिंडार पडून काँग्रेस पक्षाला याचा मोठा फायदा होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये