ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजरी ते पळसगाव रखडलेल्या रस्त्याचे काम त्वरित चालू करा

कुलदीप नामदेव मन्ने यांची मागणी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्रातील माजरी ते पळसगाव रस्त्याचे काम अज्ञाप ही पूर्ण झाले नाही. भद्रावती तालुक्यातील माजरी व पळसगाव या दोन गावांना जोडणारा रस्ता म्हणजे लोकांच्या दैनंदिन जीवनातील महत्वपूर्ण घटक आहे.

पळसगावातील लोकांना आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करण्याकरिता बाहेर जावे लागते परंतु बाहेर जाण्याकरिता रस्त्याचे बेहाल आहेत. रस्त्यात जागो जागी खड्डे तसेच रस्त्याचा दोन्ही कडेला शेत जमीन असल्याने कधी कधी वन्य पशु प्राण्यामुळे देखील नागरिकांच्या मनात रस्त्याने ये जा करण्याकरिता भीती चे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच दु चाकी स्वारकांना देखील भविष्यात जीवित हाणी होण्याचे नाकारले जाऊ शकत नाही.

अश्यातच सध्या परिस्थिती जानुन घेऊन दि. ३१ जानेवारी रोजी भारतीय जनता युवा मोर्चा भद्रावती तालुक्याचे सचिव श्री. कुलदीप नामदेव मन्ने यांनी मा. आमदार श्री. करण जी देवतळे (वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्र) यांच्या कळे माजरी ते पळसगाव रस्त्याचे रोखलेले काम त्वरित पूर्ण करून नागरिकांना सहकार्य करावे या संदर्भात निवेदन पत्रा द्वारे मागणी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये