अथक परिश्रम घेऊन मिसिंग महिलेचा व मुलीचा शोध घेण्यास यशस्वी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
जय हिंद पोलीस स्टेशन फुलगाव येथील मिसिंग क्रमांक 55/2024 दिनांक 12/11/2024 मधील मिसिंग महिला नामे सौ. दिपाली निलेश फरांदे, वय 26 वर्ष व तिची मुलगी कुमारी लावण्या निलेश फरांदे वय 2 वर्ष 6 महिने रा. इंझाळा, ता. देवळी, जि. वर्धा यांचे शोध करिता मा. पोलीस अधीक्षक सा. वर्धा यांचे परवानगीने HC/ राजेंद्र हाडके, PC/गितेश देवघरे, LPC/सोनी राठोड असे सुरत गुजरात राज्यात जाऊन पोलीस स्टेशन सचिन जिल्हा सुरत गुजरात येथे जाऊन मिसिंग महिला व मुली बाबत कोणताही ठोस पुरावा नसताना पोलीस स्टेशन पुलगाव येथील मिसिंग पथकाचे प्रमुख राजेंद्र हाडके, गितेश देवघरे, सोनी राठोड व सायबर सेलचे पोहवा दिनेश बोथकर, अक्षय राऊत यांनी वेळोवेळी सहकार्य केल्याने पोलीस स्टेशन सचिन जिल्हा सुरत येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने मिसिंग महिला व मुलीचा शोध घेतला असता सदर ठिकाणी बाहेर राज्यातील परिवार व मजूर वर्ग राहत असल्याने यांचा शोध घेण्याकरिता फार अडचणी निर्माण झाल्या असताना सुद्धा त्यांनी अथक परिश्रम घेऊन मिसिंग महिलेचा व मुलीचा शोध घेण्यास यशस्वी झाले.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक वर्धा श्री. अनुराग जैन, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री सागर कुमार कवडे, माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री राहुल चव्हाण, उपविभाग पुलगाव, माननीय पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे पोलीस स्टेशन पुलगाव यांचे मार्गदर्शनात मिसिंग पथकाचे प्रमुख राजेंद्र हाडके, गितेश देवघरे, विनोद रघाटाटे, सोनी राठोड व सायबर सेल वर्धा चे पोहवा दिनेश बोथकर, अक्षय राऊत व पोलीस मित्र सुरज खडसे यांनी केली.