Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

आरोग्य शिबिरात अस्थिरोगाने त्रस्त 470 रुग्णांची मोफत तपासणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा शहरातील अस्थीरोग तज्ञ डॉक्टर वैभव वायाळ यांच्या वायाळ एक्सीडेंट आणि जॉईन्ट रिप्लेसमेंट हॉस्पिटलच्या वतीने दिनांक 18 जानेवारी रोजी मोफत अस्थीरोग व सांधेवात निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या शिबिरामध्ये मुंबई येथील तज्ञ अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रमोद तुपे डॉक्टर नितीन मुंढे डॉक्टर राणी मेश्राम व स्वतः डॉक्टर वैभव वायाळ यांनी वेगवेगळ्या अस्थिरोग आजाराने त्रस्त अशा 470 रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना मोफत सल्ला सुद्धा देण्यात आला.

या शिबिरात ९० वयोवृद्ध रुग्णांची तपासणी, सांधेवाताने त्रस्त अशा सत्तर रुपयांची तपासणी मणक्यांचे आजाराने त्रस्त अश्या 110 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली तर प्रथमच तपासणीमध्ये 24 रुग्ण हे सांधेवाताने त्रस्त होते मात्र त्यांचे निदान झाले नव्हते अशा रुग्णांची इतर चाचण्या करून घेतल्यानंतर त्यांना सांधेवात असल्याचे निष्पन्न झाले तर 80 रुग्णांचे क्ष किरण द्वारे निदान करण्यात आले शहरात प्रथमच आयोजित या अस्थिरोग व सांधेवात निदान व उपचार शिबिराला संपूर्ण पंचक्रोशीतील अस्थीरोगाने त्रस्त रुग्णांनी भेट देऊन तपासणी करून घेतली.

सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत 470 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला सदर आरोग्य शिबिर यशस्वी साठी डॉक्टर वैभव वायाळ व त्यांच्या टीमने खूप घेतली ज्या ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे अशा रुग्णांना शस्त्रक्रियेमध्ये आर्थिक सूट देण्यात येणार असल्याचे डॉक्टर वैभव वायाळ यांनी यावेळी रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सांगितले तर तपासणीसाठी आलेले मुंबईतील अस्थिरोग तज्ञ यांच्याकडे जरी शास्त्रक्रिया करण्याची तयारी दर्शवली त्यासाठी सुद्धा अशा रुग्णांना सवलती मध्ये शस्त्रक्रिया करून देण्यात येणार आहे असे यावेळी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये