ताज्या घडामोडी

घंटागाडी कामगारांच्या मागण्या मान्य – मनपा आयुक्त विपिन पालीवाल ह्यांची घोषणा

संप मागे घेण्याचे चंद्रपूर महानगरपालिकेचे कचरा संकलन कामगारांना आवाहन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

कचरा संकलन आणि वाहतुक या कामांवर काम करणारे कामगार 6 ऑक्टोबरपासून संपावर गेले आहेत. यामुळे सणासुदीच्या काळात चंद्रपूर शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. कचरा संकलनाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता असल्याने आपल्या कुटुंबाचे भविष्य बघता कामगारांनी हे संप मागे घ्यावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले.

कचरा संकलन करणाऱ्या कामगारांनी पुकारलेला संप मागे घेण्यात यावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्याबाबत चे पत्र दिले आहे. त्यांच्या मागण्यांमध्ये जुन्या वेतन आश्वासनांचे पालन करणे, 30 मजुरांना पुन्हा नोकरीवर घेणे आणि वेतन चिट्ण्या नियमित देणे यांचा समावेश आहे.

काल दिनांक १०/१०/२०२३ रोजी उपायुक्त यांचे कक्षात झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार संदर्भ पत्राच्या अनुषंगाने खालील मागण्या मान्य करण्यात येत आहे. १) जुने कंत्राटदार सेंटर फॉर डेव्हलपमेन्ट कम्युनिकेशन, जयपुर ब्रांच नागपूर याप्रमाणे वेतन तात्काळ प्रभावाने लागू करून पुढील काळाकरीता देण्यात येईल.

2) जुन्या वेतन आश्वासनांचे पालन करून कामगारांना नवीन वेतन देण्यात येईल.

3) 30 मजुरांना पुन्हा नोकरीवर घेण्यात येईल.

4) वेतन चिट्ण्या नियमित देण्यात येतील.

ह्या चारही प्रमुख मागण्या मनपा प्रशासनाने प्राधान्याने मान्य केल्याचे आश्वासन देण्यात आले असुन घंटागाडी कामगारांनी संप मागे घेऊन 12 ऑक्टोबरपासून नियमित कचरा संकलन सुरू करावे, असे आवाहन मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी केले आहे.

काय म्हणाले मनपा आयुक्त 👇

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये