ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना नगरीत प्रथमच शंकरपटाच उद्घघाटक कार्यक्रम संपन्न

पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक 45 बैलजोड्या उपस्थित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना नगरीत प्रथम शंकरपटाचे आयोजन श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचे नवनिर्मित मंदिराचे बांधकाम करिता तसेच विठ्ठल रुक्माई मूर्ती स्थापना करिता जंगी इनामी शंकरपटाचे आयोजन 23, 24, 25, फेब्रुवारी सतत तीन दिवस असलेला शंकरपटात पहिल्याच दिवशी 45 बैल जोड्या यांनी शंकरपटामध्ये सहभाग घेतला आंध्र प्रदेशच्या टोकावर असलेल्या कोरपणा शहरात प्रथमच हिमायतनगर तालुका जिल्हा नांदेड, मेट उमरखेड आरंभी साजेगाव तालुका दारवा जिल्हा यवतमाळ असे अनेक कन्याकोपऱ्यातील बैलजोड्या शंकरपटामध्ये स्पर्धेमध्ये मालकांनी सहभाग घेतला.

कोरपणा तालुक्यातील तुकाराम मालेकर रा पिपरी यांच्या मालकीचा गोलू व छोटू बैल जोडीने आज स्पेशल क्रमांक पहिल्याच दिवशी 9.8 सेकंदात अंतर कापले या बैलजोडी व मालकाचे प्रेक्षकानी व मंडळांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात कौतुक केले तसेच शंकरपट पहाण्याकरिता बाहेरगावातील नागरिक व गावातील नागरिक यांनी अलोट गर्दी केली होती. शंकरपटाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धनराज गिरडकर सुरेश मालेकर, गणेश गोडे, कवडू बोरडे. नागोबा मालिकार, नारायण हजारे, पुंडलिक गिरसावडे,उमेश वैरागडे, रमेश धारणकर, सुंदर असं संचालक उमेश पालीवार यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये