Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सासरच्या जाचाला कंटाळून 32 वर्षीय विवाहतेची गळफास घेऊन आत्महत्या

एकता नगर वसाहतितील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून एका 32 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरालगतच्या वेकोलीच्या एकता नगर वसाहतीत दिनांक 13 ला घडली. रुबी पवन राय, वय 32 वर्षे, राहणार एकता नगर वसाहत असे मृतक विवाहित महिलेचे नाव आहे.

मृतक महिला ही वेकोलीच्या एकता नगर वसाहतीत आपल्या कुटुंबासह राहत होती. तिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. सदर घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये