Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अज्ञात व्यक्तीचा रेल्वेने कटुन मृत्यू

चिरादेवी गावाजवळील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           एका अज्ञात व्यक्तीचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 12 ला तालुक्यातील चिरादेवी गावाजवळील रेल्वे लाईन वर सकाळीउघडकीस आली. सदर मृतक हा 45 ते 50 वयोगटातील असून त्याच्या अंगावर टी-शर्ट असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.

घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व मार्ग दाखल केला. सदर व्यक्तीची ओळख पटल्यास किंवा परिसरातील या वयोगटातील एखादा इसम बेपत्ता असल्यास त्यांनी भद्रावती पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे आवाहन भद्रावती पोलिसांकडून करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये