Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्र

आज मेहुणा राजा येथे संत चोखामेळा यांचा जन्मोत्सव सोहळा

चांदा ब्लास्ट

जिल्हा परिषद बुलढाणा, पंचायत समिती देऊळगाव राजा, व ग्राम पंचायत, मेहुणा राजा यांच्या संयुक्त विद्यमाने संत चोखामेळा यांचा 757 वा जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन जन्म स्थळ मेहुणा राजा येथे आज दिनांक 14 जानेवारी रोजी कऱण्यात आले आहे.

सकाळी 7.30 वाजता महापुजा आमदार मनोज कायंदे व जिल्हा परिषद चे मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाबराव खरात यांच्या हस्ते होईल.

सकाळी आठ वाजता पालखी मिरवणूक काढण्यात येईल.

स्वागत समारंभ ला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार डॉ राजेंद्र शिंगणे, तोताराम कायंदे,डॉ शशिकांत खेडेकर, हर्षवर्धन सपकाळ,शिक्षणाधिकारी बी आर खरात, बाबुराव नागरे, प्रा. कमलेश खिल्लारे, राहणार आहे.

कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन गट विकास अधिकारी मुकेश माहोर, सहा गट विकास अधिकारी पल्लवी लांडे, गट शिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, सरपंच मंदा बोंद्रे,उपसरपंच साहेबराव काकडे, ग्राम पंचायत अधिकारी मदन वायाळ यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये