
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी: होमगार्ड पथकातील सेवानिवृत्त सैनिकांचा गौरव करण्यासाठी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या प्रांगणात रविवारी (१२ जानेवारी) विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
सत्कार समारंभात जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे केंद्रनायक नरेशजी राहुड, ब्रह्मपुरी पथकाचे समादेशक अधिकारी पठाण, नागभीड पथकाचे समादेशक जक्कनवार साहेब, तसेच ब्रह्मपुरी पथकातील सेवानिवृत्त सैनिक दादाजी बनकर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी साप्ताहिक कवायत पार पडली. यावेळी विनोदजी लाखे, महादेव ठेंगरी, नागभीड पथकाचे सैनिक मंगेश आंबोरकर यांसह होमगार्ड पथकातील महिला व पुरुष सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारमूर्ती राहुड साहेब आणि दादाजी बनकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांनाही शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवळुजी पिंपळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन चंद्रशेखर बावनकुळे यांनी मानले. या सन्मान सोहळ्याने सेवानिवृत्त सैनिकांच्या कार्याचा उचित गौरव करण्यात आला.



