Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

रामसेतूजवळील तिरुपती बालाजी मंदिरात चोरी

चोरट्यांनी दानपेटीतून लाखांची रक्कम केली लंपास

चांदा ब्लास्ट

नवीन चंद्रपूर शहराजवळ दाताळा नदीकाठी रामसेतू पुलाजवळ असलेल्या सुप्रसिद्ध बालाजी मंदिरात आज पहाटे २.३० वाजताच्या सुमारास ७ चोरट्यानी मंदिरातील दानपेटी फोडून लाखो रुपये लंपास केले असून, तत्पूर्वी, त्यांनी मंदिराच्या चौकीदाराला बांधून तळघरात डांबून ठेवले. विशेष म्हणजे, यातील एक चोर रात्री १२ वाजता मंदिरात येऊन रेकी करून गेला होता. हा सर्व घटनाक्रम मंदिरातील सिसिटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

काल रात्री १२ वाजता दरम्यान मंदिरात आलेला चोर सर्व बघून गेला होता. त्यानंतर त्याने मध्यरात्री मंदिरात प्रवेश करून सभागृहात झोपलेल्या चौकीदाराला दोरीने बांधून खाली बांधकाम सुरू असलेल्या जागी तोंडात बोळा टाकून कोंडून ठेवून चोरट्यानी मंदिरातील दानपेटी फाडली. दानपेटीत लाखो रुपयांचे दान होते. ते चोरट्याने लुटले आणि मंदिराच्या गर्भगृहात जाण्यासाठीचे लाकडी दाराचे कुलूप तोडण्याचाही प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. मात्र, दानपेटीची मोठी रक्कम घेऊन ते फरार झाले. मंदिराचे अध्यक्ष माजी खासदार नरेशबाबू पुगलिया आहेत. त्यांचे सुपुत्र राहुल पुगलिया यांनी शहर पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. पहाटेच पोलिसांनी कार्यवाही सुरु केली. तपास सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये