Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

विदर्भ (पूर्व) विभागीय अध्यक्ष पदी प्रा डॉ अशोक सालोटकर यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी येथील डॉ. प्रा. अशोक सालोटकर यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळाची संत नगाजी महाराज सांस्कृतिक भवन, महाल नागपूर येथे पूर्व विदर्भ विभागाच्या सभेत प्रदेश कार्यध्यक्ष श्री. श्यामजी आस्करकर यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच प्रदेश ऊपाध्यक्ष श्री. राजेंद्र इंगळे यांचे अध्यक्षतेखाली सभा संपन्न होवून त्यात प्रा. डॉ. सालोटकर यांची विदर्भ पुर्व विभागीय अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

तसेच कार्यकारणी नियुक्ती करण्यात आली.सरचिटणिस श्री.जगदिश सुर्यवंशी,उपाध्यक्ष म्हणून कृपाल लांजेवार,मधुकर फुलबांधे ,मोहन निंबाळकर,संघठक म्हणून धनराज गुंडलवार, घनश्याम सुर्यवंशी या सर्वाना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली .या सर्वांचे ब्रह्मपुरी नाभिक समाजाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

  या प्रसंगी मार्गदर्शक श्री रमेशराव लाकूडकर, श्री रोशन उरकुडे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष श्री तुषार चोपकर, पूर्व विदर्भ युवा अध्यक्ष श्री शरद उरकुडे, नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष श्री राजेंद्र फुलबांधे, सरचिटणीस श्री वैभव तुरक, उपाध्यक्ष श्री राजू चिंचाळकर, कार्य सचिव श्री विजय वालुकर, महिला जिल्हा सचिव श्रीमती मालती अमृतकर यांचे सह नागपूर जिल्हा पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

   दि. १ फेब्रुवारी २०२५ ला होणाऱ्या विदर्भ स्तरीय समाज मेळाव्यास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये