ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने इसमाचा मृत्यू

वादळात विद्युत तार तुटल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 सतत येणाऱ्या वादळामुळे विद्युत महामंडळाच्या खांबावरील तार शेत शिवाराच्या तारेच्या कुंपणावर पडल्याने त्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान लेंडारा लाव परिसरातील आमराईत घडली.

 महादेव कृष्णाजी दरवरे, वय 55 वर्ष रा. शिवरकर सोसायटी भद्रावती असे शॉक लागुन मृत पावलेल्या इसमाचे नाव आहे. महादेव हा नेहमी प्रमाणे शेत काम आटपून घराकडे परत येत असतांना शिवारातील लोखंडी तारा असलेल्या गेट जवळ वादळामुळे येथील विद्युत खांबावरील जिवंत विद्युत प्रवाह असलेला तार पडला होता त्यामुळे संपूर्ण कुंपना मध्ये करंट असल्याने त्याच वेळेस महादेव ने कुंपणाला हात लावताच त्याचा शॉक लागून जागेवरच मृत्यू झाला घटनेची माहिती विद्युत महामंडळ व पोलीस विभागाला देण्यात आली.

पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये