ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गुरुकुल महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गुरुकुल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथे दिनांक 15/ 10 /2026 रोजी भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.
याप्रसंगी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ. अनिल मुसळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश शेंडे, डॉ. प्रशांत पुराणिक, डॉ. राजेश डोंगरे, प्रा. सचिन कर्णेवार यांची प्रामुख्याने उपस्थित होती.
सदर कार्यक्रमात डॉ.अनिल मुसळे व प्राचार्य डॉ.प्रकाश शेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सुशांत खिरटकर, प्रफुल मुसळे, संतोष चौधरी, प्रशांत नवले, शालिक कांबळे,सविन मडावी, ननीता बुरान यांनी परिश्रम घेतले.



