Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

शास्वत शेतीच्या दिशेने एक पाऊल

बळीवंश लोकचळवळीच्या वतीने ने केले रूम्हना येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

शेती हा आपला मुख्य व्यवसाय असून त्याचबरोबर शेतीला जोड धंदा असणे हे महत्त्वाचे मानले जाते. शेतीला पशु पालनाचा म्हणजेच दुग्ध उत्पादनाचा जोड

धंदा असल्यास शेतकरी आपली प्रगती साधू शकतो याच अनुषंगाने बळीवंश लोक चळवळीने शास्वत शेती आणि सधन शेतकरी या आपल्या वाटचालीत एक पाऊल टाकत याआधी गावोगावी यशस्वी रित्या आयोजित केलेल्या मोफत माती परीक्षण साखळी शिबिरानंतर या मेळाव्याचे आयोजन केले होते.

यामध्ये प्रामुख्याने शासकीय योजना, कर्जप्रकरणे, तांत्रिक सहकार्य इत्यादी बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले परिसरातील देवखेड ,तांदुळवाडी, सोयंदेव, जांभोरा, खेरखेड, चांगेफळ धानोरा व रूम्हणा या गावातील दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. प्रसंगी या कार्यक्रमासाठी डॉक्टर सतीश मुंडे व एचडी एफसी बँकेचे अधिकारी देवानंद आघाव व राजमाता डेअरीचे संचालक वेदांत शेळके व निलेश भुतेकर यांनी दूध उत्पादकांना विविध विषयांवर शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले ‌.

पशुपालन व दुग्ध उत्पादनाविषयी सखोल माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत अनेक आर्थिक सहकार्य यासंबंधी बाबी विषयी शेतकऱ्यांना अवगत केले.

बळीवंश लोकचळीचे प्रणेते श्री नितीन कायंदे यांच्या संकल्पनेतून व पशुसंवर्धन विभाग सिंदखेड राजा तथा एच डी एफ सी बँक दुसरबीड व श्री दूध डेअरी रूम्हना यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या मेळाव्यासाठी श्री शिवराज भाऊ कायंदे, ज्ञानदेव खेडकर हे प्रमुख अतिथी होते प्रसंगी शरद कायंदे,बद्रीनाथ कायंदे, सुरज खरात,विजय जायभाये,ज्ञानेश्वर कायंदे,शिवनारायण नागरे, विनोद कायंदे,देवानंद कायंदे, विजय डोळे,गजानन आढाव अरुण भोसले,पांडुरंग वायाळ, ओम जावळे,कल्याण मोगल, अविनाश आढाव,बाबासाहेब आढाव ,विजय काळे योगेश देशमुख, बबन जायभाये आदी शेतकरी बांधव तसेच डॉ सुनील शिंदे, डॉ शिवदत्त साखरे ,डॉ अभिलाष मोगल ही तज्ज्ञ मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये