११ जानेवारी रोजी चंद्रपूर येथे वाहतूक जनजागृती व रॅलीचे आयोजन
चंद्रपूर जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल, संचालक संघटना व परिवहन विभाग व वाहतूक नियंत्रण शाखा, चंद्रपूर यांचा संयुक्त उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती व्हावी, या उद्देशाने चंद्रपूर जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल, संचालक संघटना व वाहतूक नियंत्रण शाखा, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ११ जानेवारी रोजी रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान २०२५ अनुषंगाने विविध ठिकाणी जनजागृती केली जाणार आहे.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा जीवन रक्षा व उज्वल भविष्यासाठी आवश्यकता असलेली नियमितता या संबधाने अपघाताची कारणे व त्यावरील उपाय याची माहिती देण्यात येणार आहे. सोबतच विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. संघटनेच्या वतीने सकाळी ८.०० वाजता सर्व ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रशिक्षण वाहनांची परिवहन कार्यालय, चंद्रपूर (जलनगर ) पासून जटपूरा गेट ,गांधी चौक, जनता कॉलेज मार्गे प्रादेशिक परिवहन कार्यालय अशी कार व बाईक रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना, वाहन चालकांना नियमांची माहिती करून दिली जाणार आहे.
शालेय – महाविद्यालयीन विद्यार्थी व समस्त नागरिकांनी रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत आयोजित रॅली, जनजागृती कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रपूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम,चंद्रपूर जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आंबटकर, कार्याध्यक्ष कोमल धनपाल जयस्वाल, उपाध्यक्ष रवींद्र सोनवने, सचिव गजानन पायघण, संघटनेचे पदाधिकारी नौशाद अब्दुल जब्बार शेख, सदस्य प्रमोद भोवते, प्रेमदास सरजोरे, लक्ष्मी पोहनकर, अरुणा लहामगे, पल्लवी नागलकर, मो. शकील शेख ने.शाहिर शेख आदींनी यांनी केले आहे.