Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

विवेकानंद विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती : स्थानिक विवेकानंद माध्यमिक विद्यालयात ०३ जानेवारी २०२५ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय लांबट होते.

प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षिका कल्पना बांदूरकर, आशा गावंडे तसेच सहायक शिक्षक दयाकर मग्गीडवार, संजय आगलावे आणि विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी तथा शिक्षण स्वयंसेविका निशा खंडाळकर व श्रुती खोब्रागडे यांची विशेषत्वाने उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली.

निशा खंडाळकर या माजी विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एक सूंदर गीत सादर केले.

याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी समयोचित भाषणे सादर केली. माजी विद्यार्थिनी व शिक्षण स्वयंसेविका श्रुती खोब्रागडे हिने आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या मुलींच्या शिक्षणातील भरीव योगदानाविषयी माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक विजय लांबट यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या संघर्षमय जीवनाची क्रांतिकारी गाथा ऐकवली.

याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक तुकाराम पोफळे यांनी केले.

प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक दयाकर मग्गीडवार यांनी केले, तर आभार शिक्षण स्वयंसेविका श्रुती खोब्रागडे हिने मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये