Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर 

नागरिकांच्या कामाचा खोळंबा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगना राज्य सीमेवर दुर्गम आदिवासी बहुल क्षेत्रातील १९९२ मध्ये कोरपना तहसिल अस्तित्वात आली या भागात महसूल विभागाचे ७३ पद मंजूर असून भरलेली पद ५४ आहे मात्र तहसिल कार्यालयात तहसिलदाराची जागा २७ सप्टेंबर २०२३ पासून रिक्त असून राजुरा येथील तहसीलदार यांच्या कडे कोरपना च्या कार्यालयाचा प्रभार आहे या ठिकाणी उद्योग व WCL रेती घाट, मोठ्या प्रमाणात असल्याने कामाचा व्याप व अधिक महसूल देणार म्हणून या तालुक्याची ओळख आहे.

तहसिल कार्यालयात तहसिलदार नायब तहसिलदार ह्या दोन जागा रिक्त आहेत तर महसूल सहाय्यक ३ जागा रिक्त आहेत वर्ग ३ च्या महसूल सहाय्यकांची निवडणूक विभागात १ जागा रिक्त आहे रोहयो अंतर्गत वर्ग ३ ची पुरवठा निरीक्षक १ जागा गोदाम सहाय्यक १ जागा लिपिक,गोदाम लिपिक १३ जागा वर्ग ४ च्या ३ जागा रिक्त आहेत तलाठीचे २ जागा तर कोतवाल ५ जागा रिक्त असल्यामुळे एकाच विभागातील टेबलवर २ ते ३ विभागाचा काम असल्यामुळे नागरिकांचे काम वेळेवर होत नाहीत या भागात वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करण्यामध्ये नागरिकांना कार्यावरची कसरत करावी लागते तहसिलकार्यालया मध्ये तहसीलदार नसल्यामुळे अर्धे-अधिक टेबल खाली असल्याने नागरिकांना कामासाठी अनेक वेळा चकरा टाकावे लागत आहे.

कोरपना येथील महसूल विभागाच्या रिक्त जागा व कायम स्वरूपी तहसीलदार तातळीने देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सह सचिव सय्यद आबिद अली यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,आमदार देवरावदादा भोंगळे,जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये