समृध्दी महामार्गावर दिल्ली ते मुंबई येथे सुगंधित तंबाखुची वाहतुक
आरोपीतांकडुन १ करोड ६ हजारांवर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक ०५/०१/२०२५ रोजी पोलीस स्टेशन सिंदी (रेल्वे) परीसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहितीचे आधारे अशोक लिलैंड कंपनीचा कंटेनर क्रमांक आर.जे. ५२ जि.ए. ५६७० मधुन प्रतिबंधीत सुगंधित तंबाखुची दिल्ली येथुन सिंदी (रेल्वे), जि. वर्धा मार्ग मुंबई येथे समृध्दी महामागनि वाहतुक करीत असल्या बाबत माहीती प्राप्त झाल्यावरून अन्न सुरक्षा अधिकारी वर्धा यांना पत्र देउन त्यांचे सोबत पंचा समक्ष पो. स्टाफ चे मदतीने समृद्धी महामार्गावर कटेनर थांबवुन सदर कटेनर पो.स्टे सिंदी (रेल्वे) येथे नेवुन कटेनर चालक क. १) शाहीद ईलीयास, वय ३२ वर्षे, रा. मु.पो. अडवर, ता. जि. नुह (मेवात), रा. हरियाणा २) हाकमखॉन शाकिरखॉन वय २२ वर्षे, रा. मु.पो. अडवर, ता.जि. नुह (मेवात), रा. हरियाणा यांना ताब्यात घेउन कंटेनर मधील मालाबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की, सदर कंटेनरमधील माल हा दिपक ट्रान्सपोर्ट चे मालक व विकास छाबडा दोन्ही रा. दिल्ली यांचे असल्याचे सांगितले. पंचासमक्ष पोस्टाफचे मदतीने कंटेनरची पाहणी केली असता सदर कटेन मध्ये क. ०१) सुपर कॅश गोल्ड कंपनीचा सुगंधित तंबाखु वनज ५१०३ कि.ग्रॅ. २) सिग्नेचर कंपनीचा सुगंधित पान मसाला वजन ११०१ कि.ग्रॅ. ३) व्ही.सी. ५ कंपनिचा सुगंधित तंबाखु वजन ८५० कि.ग्रॅ. असा प्रतिबंधीत सुगंधित तंबाखु किंमत ७०,०६,५००/- रू तसेच वाहतुकीसाठी वापनण्यात आलेले कटेनर किमंत ३०,००,०००/- रू. असा एकुण जु.कि. १,००,०६,५००/- रू.चा मुद्देमाल मिळुन आल्याने सदरचा माल गुन्हयाचे पुराव्याकामी ताब्यात घेवून आरोपी क्र. १) शाहीद ईलीयास, वय ३२ वर्षे, रा. मु.पो. अडवर, ता.जि. नुह (मेवात), रा. हरियाणा २) हाकमखॉन शाकिरखॉन वय २२ वर्षे, रा. मु.पो. अडवर, ता.जि. नुह (मेवात), रा. हरियाणा ०३) दिपक ट्रान्सपोर्ट चे मालक ४) विकास छाबडा दोन्ही रा. दिल्ली ५) वाहन मालक अशिना विकास छाबडा रा. दिल्ली यांचे विरूध्द पोलीस स्टेशन सिंदी (रेल्वे) येथे कलम १२३, २७४, २७५, २२३, भा.न्या.सं. सह कलम २६(१), २६(२) (iv), २७ (३) (e), ३०(२) (a), ३(१) (zz) (iv), ५९ अंन्नसुरक्षा व मानके कायदया अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा, मा. डॉ. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी, पोउपनि अमोल लगड, राहुल ईटेकार, बालाजी लालपालवाले व पोलीस अंमलदार नरेन्द्र पाराशर, मनिष श्रीवास, गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, भुषण निघोट, रितेश शर्मा, मनिष कांबळे, अमोल नगराळे, नितीन ईटकरे, गोपाल बावणकर, सागर भोसले, मंगेश आदे, दिपक साठे, मिथुन जिचकार, प्रफुल पुनवटकर, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.