
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथे आज दिनांक 05/01/ 2025 शनिवारला आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे चे उद्घाटन माननीय मुख्याध्यापक श्री साईनाथ मेश्राम यांनी फीत कापून केले,याप्रसंगी पर्यवेक्षिका सौ लता देशमुख मॅडम, स्काऊट गाईडचे ज्येष्ठ शिक्षक श्री देवराव जाधव, श्री सतीश ठाकरे श्री प्रशांत धाबेकर व इतर शिक्षक उपस्थित होते.
यात 5 ते 10 वि च्या जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी मिळून 50 स्टॉल लावले ज्यामध्ये विविध प्रकारचे पदार्थ बनवण्यात आले होते, शाळेच्या इतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी त्याचा आनंद घेतला. आनंदमेळाव्याचा माध्यमातून विद्यार्थ्यांना छोट्या व्यवसायाची जाणीव तसेच व्यवहारी ज्ञान मिळावे हा उद्देश होता.