Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थिनींची मेजवानी

चांदा ब्लास्ट

 घुग्घुस (चंद्रपूर): श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली संचालित प्रियदर्शिनी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, घुग्घुस येथे दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव उत्साहात साजरा झाला.

 कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य अनु खानझोडे यांच्या अध्यक्षतेखाली अक्षय पतंगे, दीपक साळवे, लोकप्रिय समाजसेवक राजू रेड्डी, ब्रिज भूषण पाझारे, सय्यद अन्वर, दिलीप पिटलवार, अलीम शेख, फाल्गुन खमनकर आणि मुकेश भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

 महोत्सवात विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नृत्य, नाट्य, एकांकिका, कविता वाचन, कथाकथन आणि इतर कलाकृती सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

 समारोपीय सत्रात C.S.R. विभागाचे प्राचार्य अनु खानझोडे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश सातार्डे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुधीर डांगे यांनी मानले.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. वैशाली जोशी, उमादेवी लाटकरी, प्रा. माधव वनकर, गणेश मत्ते, बालाजी लेडांगे, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये