Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

पैनगंगा कोळसा खाणीत वाघाचा बंदोबस्त करा : राजुरेड्डी

मुख्य वनसंरक्षक यांना निवेदनाद्वारे मागणी

चांदा ब्लास्ट

 घुग्घुस (चंद्रपूर): वणी क्षेत्रातील पैनगंगा कोळसा खाणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाच्या उपस्थितीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात वाघाचे दर्शन वारंवार होत असल्याने पैनगंगा खाणीतील कामगार, शेतकरी, तसेच परिसरातील विरूर, गाडेगाव, सोनुर्ली, सांगोला, आवरपूर येथील रहिवासी दहशतीत आहेत.

 घुग्घुस शहरातील मोठ्या संख्येने कामगार पैनगंगा खाणीत कामासाठी जातात, ज्यांपैकी अनेक जण रात्रीच्या पाळीत काम करतात. त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या परिस्थितीची दखल घेत काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर यांना निवेदन देत तातडीने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

 कामगार व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न:

 राजुरेड्डी यांनी प्रशासनाला सतर्क करत याबाबत त्वरीत उपाययोजना करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून संभाव्य अपघात व धोकादायक परिस्थिती टाळता येईल. वाघाच्या बंदोबस्तासाठी तज्ज्ञांच्या मदतीने योग्य तो निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये