Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

स्त्री शिक्षणाचे प्रणेते सावित्रीबाई फुले यांना घुग्घूस काँग्रेस तर्फे आदरांजली

चांदा ब्लास्ट

 घुग्घुस (चंद्रपुर) : भारतातील स्त्री शिक्षणाच्या प्रणेते आणि महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त घुग्घुस शहर काँग्रेसच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जीवनकार्याला उजाळा देण्यात आला.

 सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि धैर्यामुळे आज महिलांना शिक्षण घेण्याचा व विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्व करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सावित्रीबाई यांच्या कार्यामुळेच महिलांना समाजात सन्मान आणि समानता मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य घडले. त्यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्रभर “बालिका दिन” व “महिला मुक्ती दिन” म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

 कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, महिला शहर अध्यक्ष संगीता बोबडे, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, शहर कार्याध्यक्ष दीप्ती सोनटक्के, सुजाता सोनटक्के, वैशाली दुर्योधन, निलिमा वाघमारे, भारती निमसटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करण्यात आला.

 कार्यक्रमाचा उद्देश सावित्रीबाईंच्या योगदानाचा सन्मान आणि त्यांच्या आदर्शांचा प्रसार करणे हा होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये