Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या स्त्रियांना ज्ञानाचा प्रकाश देणारी सावित्री – श्वेता खर्चे

विश्वशांती विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या स्त्रियांना ज्ञानाचा प्रकाश सावित्रीबाईंनी दाखवला.त्यांनी लावलेल्या ज्ञानज्योतीच्या प्रकाशामुळेच आज भारतीय स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत.डॉक्टर,इंजिनियर,वकील, शिक्षक या सर्व क्षेत्रात स्त्रिया दिसतात,रेल्वे,विमान सुद्धा चालवितात,इतकेच काय तर देशाच्या राष्ट्रपती,पंतप्रधान होतात,सावित्रीबाईंनी आयुष्यभर स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न केले, असे प्रमुख मार्गदर्शनात विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका श्वेता देतो खर्चे बोलत होत्या.

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम सावली नगरीतून शालेय विद्यार्थ्यांची शोभायात्रा काढण्यात आली.

       कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक मधुकर जाधव यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक जडणघडणीमध्ये अनेक समाजसुधारकांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यातील एक महत्त्वपूर्ण स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले होय,जिने स्त्री शिक्षणास प्रारंभ केला आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली असे अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन केले.मंचावर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार डॉ.राजश्री बिडवई,सहाय्यक शिक्षिका वनिता गेडाम,रिंकी कोतपल्लीवार,प्रसन्ना अल्लुरवार,उर्मिला बारेकर,मेघा संगिडवार उपस्थित होते.याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर गीत आणि भाषणे सादर करीत प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका काजल बारापात्रे यांनी केले तर आभार प्रनोती सोनुले यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये